
गर्दीचा फायदा उठवत खेड बसस्थानकातून महिलेच्या पर्समधून ४ हजार रुपये चोरीस.
खेड-चिपळूण बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा उठवत एका महिलेची ४ हजार रुपये व इतर किरकोळ सोने असलेली पर्स चोरट्याने लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आर्या शितप (रा. सुसेरी क्र. २, खेड) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
त्या चिपळूण येथे जाण्यासाठी येथील बसस्थानकात आल्या होत्या. फलाटावर लागलेल्या खेड-चिपळूण बसमध्ये चढत असताना चोरट्याने पर्सवर डल्ला मारत पोबारा केला. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली. सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने त्या-त्या मार्गावर धावणार्या बसफेर्या गर्दीने धावत आहेत. याचाच फायदा उठवत महिलांच्या पर्स लांबवण्याचे सत्र सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे..www.konkantoday.com