कोकण रेल्वेचा प्रवास प्रवाशांसाठी सुरक्षित व्हावा यासाठी ६५ जीआरपी पथके तैनात


दीपावली व छट पूजा सणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासह गर्दी विभाजनासाठी कोकण मार्गावर ६५ जीआरपी कर्मचार्‍यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रवाशांच्या आरामदारी प्रवासासाठी तिकिट तपासणी मोहीम २४ तास कार्यान्वित असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिली.
दीपावली सण सुरू असल्याने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठ एलटीटी, यशवंतपूर, पनवेल, थिरूवअनंतपूरम, सावंतवाडी, मडगाव, चिपळूण मार्गावर जादा विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त मुजफ्फरपूर, जबलपूर, नागपूर, उधना, वास्का द गामा, कोईमतूर, मडगांव, मंगळूर सांसारख्या ठिकाणीही ५५ विशेष गाड्या आधीपासूनच चालवण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सुरळीत सेवेसाठी संवाद आणि नियमित घोषणा अन प्रवाशांना अपटेट दिल्या जात आहेत.
गर्दीच्या हंगामामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता जीआरपी पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. केआरसीएलचे वरिष्ठ अधिकारी ऑपरेशन्स आणि उत्सव व्यवस्थेचे सक्रीयपणे निरीक्षण करत आहेत. वैयक्तिकरित्या सुविधांची तपासणी केली जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button