मालवण-देवली कालवण नदी खाडीपात्रात वाळू काढण्याच्या कारणावरून प्राणघातक हल्लात परप्रांतीय कामगार ठार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-देवली कालवण नदी खाडीपात्रात वाळू काढण्याच्या कारणावरून परप्रांतीय कामगारांवर प्राणघातक हल्ला झाला. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सकलदीप मनबहाल सिंह (, रा. सीरम मक्का लोहरदगा, राज्य झारखंड) हा कामगार जागीच ठार झाला. या
हल्ल्यात तीन कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्याप्रकरणी तात्या ऊर्फ भिकाजी पवार (, रा कालवण- वेंगुर्ले) व राकेश रघुनाथ गावडे रा. डिकवल) या दोघा संशयितांविरुद्ध मालवण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com