
अपघातास कारणीभूत ठरत असलेले चिपळूण शहरातील एकही बॅनर झळकणार नाही -ना. उदय सामंत यांचे आश्वासन.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरातील बहाद्दूरशेख नाका, पॉवर हाऊस चौकात राजकारण्याचे भले मोठे बॅनर झळकत आहेत. हे बॅनर अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने त्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे विधानसभा, क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी आढावा बैठकीदरम्यान पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे केली. या मागणीची तत्काळ दखल घेत ना. सामंत यांनी यापुढे त्या ठिकाणी राजकारणीच काय कोणताही बॅनर लागणार नाही, असा शब्द तेत ऑन दी स्पॉट निर्णय लावला. तशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना केल्या आहेत.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शनिवारी चिपळुणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी बाळा कदम यांनी बहाद्दूरशेख नाका तसेच पाग पॉवर हाऊस चौक येथे बेकायदेशीर झळकणारे विविद फलक, राजकारण्यांचे मोठे मोठे बॅनर यांच्याकडे ना. सामंत यांचे लक्ष वेधले. या बॅनरमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकजण जायबंदी तर काहींना जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा बॅनरवर ताबडतोब कारवाई करावी व या परिसरात वाहतुकीला अडथळा ठरेल असा एकही बॅनर लावून दिला जावू नये, अशी मागणी केली. यावर ना. सामंत यांनीही तातडीने ऍक्शन घेतली.www.konkantoday.com




