
मालवण मधील तरुणाचा पर्यावरणासाठी हटका प्रयोग, सुती हातरूमालावर छापली लग्नपत्रिका!
सध्याच्या युगात लग्न कार्यावर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जात आहे साध्या लग्न पत्रिकेवर देखील हजारो रुपये खर्च केले जात आहेत मात्र त्याला काहीजण अपवाद ठरत आहेतनगरपरिषदेचा कर्मचारी अनिकेत चव्हाण यांने आपल्या विवाहाची निमंत्रण पत्रिका चक्क सुती हातरुमालावर छापून, पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला.अशी निमंत्रण पत्रिका छापण्याचा हा हटके प्रयोग सिंधुदुर्गात चर्चेचा विषय ठरला आहे.त्याच्या ‘हातरुमालावरील आमंत्र पत्रिका’ या आगळ्या – वेगळ्या प्रयोगाचे कौतूक होत आहे.
हातरूमालावर स्क्रिन प्रिटिंग अथवा ऑफसेट प्रिटिंगव्दारे मजकूर छपाई केली जाते. छपाई केलेला हा मजकूर दोन ते तीन धुण्यात निघून जातो, मात्र हात रूमाल पुढे दैनंदिन वापरासाठी वापरता येतो. खरेतर एखादी निमंत्रण पत्रिका आपल्याकडे आल्यावर तिची जपणूक तो कार्यक्रम होईपर्यंत होते. त्यानंतर या पत्रिका रद्दीत, कचर्यात जातात. मात्र यात पर्यावरणाची मोठी हानी होतेकागदी निमंत्रण पत्रिकेचे दर, छपाईसह आजमितीला ही पत्रिका कमीत कमी दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत पडते. अशा वेळी छपाईसाठी हातरूमालांचा वापर केल्यास, हा खर्च प्रति पत्रिका 10 ते 12 रु. पडतो. त्यातच तीन धुलाईत या रुमालावरील छापलेला मजकूरही पूर्णतः धुतला जातो व या हातरूमालाचा पुनर्वापर पुढील सहा महिने तरी नक्की करता येतो..