
झोळंबेत पकडला 15 फूट लांब किंग कोब्रा.
दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावात रविवारी सायंकाळी एका महाकाय किंग कोब्रा सापाने दर्शन दिल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल 15 फूट लांबीचा हा विषारी साप रहदारीच्या रस्त्यावर फिरत असताना गावकर्यांनी पाहिला.
गावकर्यांनी तातडीने सर्पमित्र विठ्ठल गवस यांना संपर्क साधला. गवस यांनी घटनास्थळी धाव घेऊन सापाची पाहणी केली असता, तो किंग कोब्रा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. किंग कोब्रा हा अत्यंत विषारी आणि धोकादायक मानला जातो. त्यामुळे गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.अतिशय शिताफीने बचाव : सर्पमित्र विठ्ठल गवस यांनी कोणतीही गडबड न करता अत्यंत तत्परतेने आणि शिताफीने या सापाला पकडले.