
तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व समर्थकृपा प्रॉडक्शनचा पुढाकार
रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून त्या गावातील अनेक कुटुंबांचे सर्वस्व वाहून गेले आहे. यांच्यासाठी जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून मदतीचे ओघ सुरू आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद व समर्थकृपा प्रॉडक्शन यांनी या कुटुंबियांच्या मदतीसाठी कोकणचा साज संगमेश्वरी बाज या लोकनाट्याचा विशेष प्रयोग शनि. दि. १३ जुलै रोजी सावरकर नाट्यगृह येथे सायं. ७ वा. आयोजित केला आहे. या नाट्यप्रयोगातून मिळणारे सर्व उत्पन्न या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. यासाठी रत्नागिरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रयोगाला उपस्थित राहून मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.