कोकणाला जोडण्यासाठी आणखी एका मार्ग तयार, कोयनेवरील केबल पुलाचे काम प्रगतिपथावर.

भविष्यात कोकणाला जोडण्यासाठी आणखी एका मार्ग तयार करणार्‍या कोयनेवरील केबल पुलाचे काम प्रगतिपथावर आहे.नव्या अत्याधुनिक स्थापत्य रचनेतून हा पूल बांधण्यात येत असून, लवकरच एक पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित केले जाणार आहे. या नव्या केबल पुलामुळे या भागाचे दळणवळण सुलभ होणार असून, पर्यटनास चालना मिळणार आहे. कोयनेवरील केबल पुलामुळे कांदाटी खोरे रत्नागिरी जिल्ह्याला जोडले जाणार आहे.कोयना धरणाच्या विशाल शिवसागर जलाशयावर केबल रचनेतून हा पूल साकारला जात आहे. पूर होत असलेला हा दुर्गम भाग शिवसागर जलाशयामुळे रत्नागिरी जिल्ह्याला जोडणे कठीण होते. या पुलामुळे हे आता शक्य होणार आहे.

सातारा जिल्ह्याचा महाबळेश्वरजवळील पाटण तालुक्याचा भाग हा दुर्गम समजला जातो. सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍या, त्यातील घनदाट झाडी आणि याच भागात साकारलेल्या कोयना जलाशयामुळे हा संपूर्ण परिसर दुर्गम बनलेला आहे. कोयना जलाशयामुळे तर या भागातील दळणवळणावर मर्यादा येत होत्या. या भागातील अनेक गावांमधील ग्रामस्थांना संपूर्ण धरणाला वेढा घालून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागिरकांचे दळणवळण सुलभ करणे आणि या भागातील निसर्गाचा फायदा घेत पर्यटन वाढीस चालना देण्याच्या उद्देशाने हा नवा केबल पूल अभारला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button