रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते भोके स्टेशनच्या दरम्याने रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू.

रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते भोके स्टेशनच्या दरम्यान रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २४ एप्रिल रोजी पहाटे ४ च्या सुमारास घडली. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पटना सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील टीसीने या घटनेची माहिती रत्नागिरी पोलिसांना दिली. रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते भोके स्टेशनच्या दरम्यान एक महिला गाडीला धडकून जखमी झाली. जखमी महिलेला रेल्वे स्टेशनच्या रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button