
चिपळूण शहरातील गॅव्हिटी पाणी योजनेच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा.
चिपळूण शहरासाठी महत्वाकांक्षी योजना ठरणार्या ग्रॅव्हीटी पाणी योजनेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी एक हेक्टर जागा आवश्यक आहे. त्या जागेच्या भूसंपादनासाठी बुधवार दि. २३ एप्रिल रोजी प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील धामणवणे ग्रामपंचायत कार्यालयात सार्वजनिक जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी या भूसंपादन प्रक्रियेवर कोणीही हरकत न घेतल्याने भूसंपादनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे तर या योजनेतून धामणवण गावालाही पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी करण्यात आल्याने त्यासंदर्भात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत दि. ५ मे रोजी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.www.konkantoday.com