
कर्नाटकातील हायस्पीड ट्रॉलरची महाराष्ट्राच्या जलक्षेत्रामध्ये घुरखोरी,मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेलाच समुद्रात घेरण्याचा प्रयत्न
रत्नागिरी : कर्नाटकातील हायस्पीड ट्रॉलरनी महाराष्ट्राच्या जलक्षेत्रामध्ये घुरखोरी करून धुमाकूळ घातला आहे. मत्स्य विभागाच्या गस्ती पथकाच्या हेनिदर्शनास आल्यानंतर त्यांनी हुसकावण्याच्या प्रयत्न केला, परंतु घुसखोरी करणाऱ्या ३० नौकांनी गस्ती नौकेलाच घेराओ घालून घाबरविण्याचा प्रयत्न केला. मत्स्य विभागाच्या धाड़सी पथकाने विरोध झुगारून एका नौकेवर ताबा मिळवत ती पकडली. या नौकेवर सुमारे २ लाख २६ हजाराची मासळी मिळाली. ही नौका मिरकरवाडा बंदरात आणण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री हे पथक समुद्रात सुमारे ८ ते १० वावामध्ये गस्त घालत होते. तेव्हा महाराष्ट्राच्या जलक्षेत्रामध्ये कर्नाटकातील सुमारे ३० हायस्पीड नौकांनी घुसखोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
www.konkantoday.com