
रत्नागिरीतील प्राचीन विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ₹3 कोटींचा निधी; ना. उदय सामंतांची घोषणा.
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विठ्ठल मंदिर संस्था, रत्नागिरी प्रसिद्ध विठ्ठल मंदिरास भेट दिली व विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मंदिराच्या सुशोभीकरणाबाबत व इमारतीच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली. यावेळी विठ्ठल मंदिर सुशोभीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जाहीर केले.



हे विठ्ठल मंदिर रत्नागिरीतील एक धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे, आणि या नव्या उपक्रमांमुळे मंदिराचा विकास अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली.या विशेष प्रसंगी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, माजी नगराध्यक्ष प्रमोद रेडीज, माजी नगरसेवक राजू तोडणकर, विजय पेंडणेकर, राजन फाळके, प्रांताधिकारी जीवन देसाई, तसेच देवस्थानचे सदस्य उपस्थित होते.


