
आशिष शेलारजी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्या ऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं- आमदार रोहित पवार
सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारला धक्का बसला. भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली. आता या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत विरोधकांना उत्तर दिले आहे.
रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील.पण आशिष शेलारजी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं. आता त्यासाठी किमान आपल्या tweet खालील रिप्लाय तरी वाचाल”.
www.konkantoday.com