लोटेतील कंपनीत साहित्य चोरी, दोघेजण गजाआड

तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक्स कंपनीच्या स्टोअरच्या गोडावूनमधून २ लाख ७२ हजार ६४६ रुपयांच्या साहित्य चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी अमित तुळशीराम गायकवाड (३२, रा. कापडी-पोलादपूर, महाड, सध्या नवी मुंबई ऐरोली), दत्तात्रय शिवाजी गोडसे (२४, नरळेवस्ती-सांगोला, सोलापूर) या दोघांच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासातच मुसक्या आवळल्या. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मारुती विलास गवळी (रा. नरळेवस्ती-सांगोला, सोलापूर) हा संशयित पसार असून पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

विनती कंपनीचे कृष्णा अशोक गांगुर्डे यांनी येथील पोलीस ठाण्यात गोडावूनमधून साहित्य चोरीस गेल्याची तक्रार नोंदवली होती. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड यांनी तपास गतिमान करत एका संशयिताच्या २४ तासातच मुसक्या आवळल्या होत्या. तर अन्य एकास चिपळुणातून शिताफीने अटक केली. अटकेतील संशयितांकडून अन्य चोर्‍यांचाही छडा लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. फरार संशयिताच्या लवकरच मुसक्या आवळू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. लोटे औद्योगिक वसाहतीसह परिसरात यापूर्वी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोरीप्रकरणात अटकेतील संशयितासह पसार संशयितांचा सहभाग आहे का? याचाही पोलिसांकडून पडताळा केला जात आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड करत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button