
एसटी महामंडळात नवीन ८०० बस दाखल करण्याचा निर्णय
एसटी महामंडळात बसची कमतरता पाहता नवीन ८०० बस दाखल करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून या बसमध्ये १५० विनावातानुकू लित शयनयान व आसन प्रकारातील आणि विजेवर धावणाऱ्या १०० भाडेतत्त्वावरील वातानुकू लित बसचा समावेश आहे. दिवाळीनंतर या सर्व बस टप्प्याटप्प्याने दाखल होतील.
एसटीच्या ताफ्यात १५ हजार ८०० बस असून यामध्ये लाल रंगाच्या परिवर्तन गाड्याच अधिक आहेत. गेल्या दीड वर्षात नवीन खरेदी न झाल्यामुळे एसटीच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाली आहे. सध्या एसटीला आणखी २००० बसची गरज असून प्रथम ७०० नवीन गाड्या घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यात सर्व बस बीएस-६ प्रणालीतील असतील.
www.konkantoday.com