
गोठ्याला भीषण आग, ११ जनावरांचा होरपळून मृत्यू.
तालुक्यातील गोळप डोंगरेवाडी येथे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये ११ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३ जनावरे गंभीर जखमी झाली. हीं घटना गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. वसंत महेश्वर बापट (५८, रा. गोळप, रत्नागिरी) यांच्या मालकीचा हा गोठा होता. आगीमध्ये गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून यात सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
गोळप येथील रहिवासी वसंत बापट यांनी घराजवळच गेल्या अनेक वर्षापासून हा गोठा होता. त्यामध्ये गायी, वासरे म्हशी व रेडा अशी २० जनावरे यांचे पालनपोषण केले जात होते. जनावरांसाठीचा गवत, पेंढा व त्यांच्यासाठी लागणारे पशुखाद्य गोठ्यामध्ये ठेवण्यात आले होते. १७ एप्रिल रोजी रात्री ८.३० च्या सुमारास या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.www.konkantoday.com