रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार ratnagiri refinery support

एका व्हाट्सअप्प ग्रुपवरून रिफायनरीचे समर्थन केल्यामुळे नरेंद्र राजाराम जोशी (गोवळ, खालचीवाडी) यांने धमकी दिल्याची तक्रार गौरव महेश परांजपे यांनी राजापूर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

Ratnagiri green refinery supporters threatened


राजापूर तालुक्यातील गोवळ भागात रिफायनरी प्रकल्प होण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. याबाबत टि.व्ही. तसेच वर्तमान पत्रातही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रस्तावित रिफायनरीच्या प्रकल्पाबाबतची माहिती मी प्रत्यक्ष घेतली व गावातील काही मंडळींना तो प्रकल्प चांगला आहे, असे प्रबोधन गेले दोन महिने करत आहे.परंतु मी करत असणारे सकारात्मक काम गावातील काही वाईट विचार करणाऱ्या मंडळींना पटत नाहीत, असे परांजपे यांनी या तक्रार अर्जात म्हटले आहे.
गोवळ गावातील स्थानिक ग्रामस्थ व मुंबई येथे राहणारे ग्रामस्थ यांचा ‘गोवळ माझं गाव’ असा व्हाट्सअप्प ग्रुप आहे. त्यामध्ये सध्या मुंबईला राहणारे नरेंद्र राजाराम जोशी हे देखील आहेत. सदर ग्रुपवर सर्व सदस्य नेहमी कोणत्या ना कोणत्या पोस्ट शेअर करीत असतात. सोमवार दि.2 ऑगस्ट रोजी नरेंद्र जोशी यांनी मला दुखावण्याच्या हेतून तसेच माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी व मला बदनाम करण्यासाठी ‘आमच्या वाडीत कोण जर आला ना विचारायला तर कपडे काडून मारीन’ असा मेसेज केल्याचे परांजपे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button