
बाप-लेकाला मारहाण, दोघा भावांवर गुन्हा.
जागेच्या वादातून बाप-लेकाला मारहाण झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील दळवटणे-रामवाडी येथे बुधवारी सकाळी ९ वाजता घडली. या प्रकरणी दोघा भावांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश रमेश चव्हाण, राकेश रमेश चव्हाण अशी गुन्हा तर भरत सीताराम जाधव (४०), सीताराम शिवराम जाधव (८०) अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याची फिर्याद भरत जाधव यांनी दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, आपण बुधवारी सकाळी आई, वडील, भाऊ व शिगवण नावाचा कामगार यांना घेऊन आपल्या जागेत लाकडे तोडण्यासाठी गेलो होतो. यावेळी आपल्याच जागेत राहणारे नीलेश चव्हाण व राकेश चव्हाण तेथे आले व त्यांनी जमिनीवरून वाद घालण्यास सुरूवात केली. अधिक वाद नको म्हणून त्यांना समजावून आपण आई, वडील, भाऊ व कामगाराला घेऊन घराकडे जात असताना या दोघांनी आपल्यासह वडिलांना मारहाण करून शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा ’दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com