
मुख्यमंत्री स्टॅलिननंतर राज ठाकरेंचा त्रिभाषा फॉर्म्युल्याला विरोध
तामिळनाडूमध्ये त्रिभाषा धोरणावर वाद सुरु असतानाच महाराष्ट्रात दोन भाषा शिकवण्याची पद्धत मोडीत काढत राज्यभर मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे.एकीकडे हिंदी भाषिकांनी यांचे स्वागत केले असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला मात्र कडाडून विरोध केला आहे. मनसे याविरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.’आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही’, असे राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.शालेय शिक्षणासाठी एनईपी २०२० च्या शिफारशींनुसार तयार करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याची योजना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) 2020) राज्यात यंदाचे शैक्षणिक वर्षापासून (२०२५-२६) अंमलबजावणी केली जाणार आहे.
या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी व इंग्रजीसोबतच हिंदी भाषाही सक्तीची केली जाणार आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला असून मनसे या निर्णयाला कडाडून विरोध करेल आणि त्याची अंमलबजावणी होणार नाही याची काळजी घेईल.