
खेड नगरपरिषद हद्दीतील २०२ कुत्र्यांचे निर्बिजीकरण
खेड नगरपरिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नगर परिषदेने पुणे येथील पेटस फोर्स कंपनीमार्फत भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत २०२ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेतील स्वच्छता निरीक्षक विनायक सावंत यांनी दिली.शहरात मोकाट कुत्र्यांच्या उच्छादाने सारेच हैराण झाले होते. नगर प्रशासनाने अखेर निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली. मोहिमेत सातत्य ठेवण्यात आल्याने भटक्या कुत्र्यांच्या संख्येत कमालीची घट झाली असून यामुळे पालकांसह वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.www.konkantoday.com