चिपळूण शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले, नागरिक त्रस्त

मार्च महिना अखेरीस वसुली, लोकसभा निवडणूक या कामात गुंतलेल्या नगर प्रशासनाचे चिपळूण शहरातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरभर अतिक्रमण वाढले असून सध्या आंब्याचा भररस्त्यातच बाजार दिसून येत आहे. सुक्या व ओल्या मच्छिची रस्त्यावरच विक्री होत आहे. त्यामुळे साहजिकच वाहतुककोंडीने डोके वर काढले असून याचा वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.गेल्या अनेक वर्षापासून शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होताना दिसत आहे. याला राजकीय आशीर्वाद व नगर परिषदेचे होत असलेले दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे. सध्यातर या अतिक्रमणात शहर इतके गुदमरले आहे की, त्याला मोकळा श्‍वास घेणेही कठीण बनले आहे. भोगाळे, चिंचनाका, भेंडीनाका आदी भागात नियमित व्यापार्‍यांसह आता आंबे विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. तसेच मार्कंडी, बहाद्दूरशेखनाका, पॉवरहाऊस, नवा बाजारपूल या भागांसह मुख्य बाजारपेठेतेतील अतिक्रमण थेट रस्त्यावर आले आहे. त्यामुळे चालणेही कठीण होवून बसले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button