
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाड तोडण्यासाठी चढलेल्या युवकाच्या पायाला झाड कापण्याच्या मशीनचे पाते लागून लागून अति रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू.
झाड तोडण्यासाठी चढलेल्या युवकाच्या पायाला झाड कापण्याच्या मशीनचे पाते लागून लागून अति रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साटेली-भेडशी येथे मंगळवारी दुपारी घडली. नागेश लाडू मयेकर (वय 40, रा.साटेली-भेडशी) असे या युवकाचे नाव आहे.नागेश मयेकर हा साटेली-भेडशी शेजारील घोटगे गावात सहकार्यांसोबत झाड तोडण्यासाठी गेला होता. प्रथम झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तो झाड कापण्याचा कटर घेऊन झाडावर चढला. दरम्यान फांद्या तोडण्याचे काम सुरू असताना अचानक कटर त्याचा पायाला लागला. यात त्याच्या मांडीची रक्तवाहिनी कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्याच परिस्थितीत त्याला साटेली-भेडशी प्राथ. रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.