
कोकण रेल्वेनेही प्रकल्पग्रस्तांसाठी १० वर्षांसाठी वयोमर्यादा वाढवावी, कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीची मागणी
एमपीएससी आणि तत्सम परीक्षांसाठी शासन वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेत आहे. त्या धर्तीवर कोकण रेल्वेनेही प्रकल्पग्रस्तांसाठी १० वर्षांसाठी वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. कोकण रेल्वे एम्प्लॉईज निवडणुका पार पडल्यावर हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही समितीने केली आहे. कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीतर्फे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सदैव कोकण रेल्वेसमोर मांडूनही अजून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही आहे, मात्र त्यासाठी लढा कायम सुरू आहे. कोरोना संकटामुळे आणि चुकीच्या नियमांमुळे अनेक प्रकल्पग्रस्तांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. www.konkantoday.com