
दहावी व बारावी खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव 21 एप्रिल पर्यंत मुदतवाढ.
रत्नागिरी, दि.12 :- फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून आपले सरकार प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने 15 एप्रिल 2025 पर्यंत स्वीकारण्याबाबत सर्व विभागीय मंडळांना कळविण्यात आलेले होते. तथापि 10 एप्रिल ते 15 एप्रिल 2025 या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल नियमित देखभालीसाठी बंद राहणार असल्याने सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून खेळाडू विद्यार्थ्यांचे कीडा गुण सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी 21 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मुख्याध्यापक/प्राचार्य व सर्व संबंधित घटकांनी उपरोक्त बाबींची नोंद घ्यावी, असे विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ सुभाष चौगुले यांनी कळविले आहे.