
खेड कन्याशाळा दुरूस्तीला मुहूर्त सापडला
. खेड शहरातील कन्याशाळेच्या वर्गखोल्या पडझडीच्या उंबरठ्यावर आहेत. वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी निधीअभावी आजवर कानाडोळा करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग गेल्या काही महिन्यांपासून समोरील सुरक्षित इमारतीत भरत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ३ मतदान केंद्रे या ठिकाणी आहेत. यामुळे अखेर कन्याशाळेच्या तीन वर्गखोल्यांच्या दुरूस्तीला मुहूर्त मिळाला आहे. दुरूस्तीसाठी साडेतीन लाख रुपयांची तरतूदही करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गुरूवारपासून दुरूस्तीच्या कामालाही प्रारंभ झाला. www.konkantoday.com