
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी 12 एप्रिल रोजी अवजड वाहनांना बंदी.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 12 एप्रिल रोजी शनिवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे रायगड जिल्हा प्रशासनाकडून तसा आदेश जारी करण्यात आले आहेत.12 एप्रिल रोजी किल्ले रायगडावर जाण्यासाठी वाहनांची गर्दी वाढणार असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या दिवशीजड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढला आहे.