400 रुग्ण बरे झाले, प्रमाण 77 टक्के ,8 नवे पॉझिटिव्ह, एकूण 519,ॲक्टीव्ह रुग्ण 96

–जिल्हयात काल सायंकाळपासून 8 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 519 आहे. कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 8 तर समाजकल्याण, रत्नागिरी येथून 15 अशा 23 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 400 झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची प्रमाण 77 टक्के आहे.
काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 8 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे
जेलरोड, रत्नागिरी – 2
कोतवडे, रत्नागिरी – 2
हर्णे, ता. दापोली – 1
गुहागर नाका, ता. चिपळूण – 2
कांगवली, ता.लांजा -1
सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 96 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे. आज कारवांचीवाडी, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 519
बरे झालेले – 400
मृत्यू – 24
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 95 + 1
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 48 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 01, संगमेश्वर तालुक्यात 1, दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 8 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 6 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 28, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 3, उपजिल्हा रुग्णालय कळबणी – 1, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 19 असे एकूण 52 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
3797 ने घटली संख्या
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 22 हजार 342 इतकी आहे.
आत्तापर्यंत 8 हजार पेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 8 हजार 727 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 8 हजार 588 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 519 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 8 हजार 43 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 139 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 139 प्रलंबित अहवालमध्ये 10 अहवाल मिरज आणि 129 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 25 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 52 हजार 894 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 79 हजार 833 आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button