
परिपत्रकाच्या अंमलबजावणीच्या मागणीबाबत जिल्हा हिवताप निर्मूलन कर्मचार्यांची निदर्शने.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली सर्व आरोग्य कार्यक्रमाचे कार्य सुरळीत चालू असताना २०१९ मध्ये काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याबाबल २६ जानेवारी २०२५ रोजी पत्र वरिष्ठ पातळीवरून काढण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना बुधवारी रस्त्यावर उतरली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यासाठी जनआक्रोश निदर्शने/आंदोलन संघटनेने केले.हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या म्हणण्यानुसार, त्या परिपत्रकास ६ वर्षापूर्वी शासनाने स्थगिती दिली होती. परत परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची गरज काय, असा प्रश्न कर्मचार्यांतून उपस्थित करून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी हे आंदोलन संघटनेचे अध्यक्ष एल. जी पुजारी, सरचिटणीस एस.एस. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.www.konkantoday.com