कोकणातील तरुणांनी चांगले दर्जेदार शिक्षण घेऊन नोकरी व उद्योगाद्वारे कोकणचे नाव राज्य, देश आणि जगभरात करावे-खासदार नारायण राणे


कोकणातील तरुणांनी चांगले दर्जेदार शिक्षण घेऊन नोकरी व उद्योगाद्वारे कोकणचे नाव राज्य, देश आणि जगभरात करावे. येथील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे तरच?कोकण खर्‍या अर्थाने समृद्ध होईल, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी देवरुख येथील कार्यक्रमात केले.या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, सौ. नीलमताई राणे, आमदार नीलेश राणे, माजी आमदार सुभाष बने, सदानंद चव्हाण, राजेंद्र महाडिक, रोहन बने, दिलीप सावंत, भाजपचे प्रमोद अधटराव, मुकुंद जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, तहसीलदार अमृता साबळे, केदार साठे आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. शहरातील मराठा भवन या ठिकाणी भाजपच्या वतीने खासदार नारायण राणे यांचा अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राणेसाहेब यांनी कोकण विकसित करत असताना येथील जनतेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रत्नागिरी करांनो वाटचाल करा. यासाठी येथील नेत्यांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी, आगामी मोठ्या प्रकल्पासाठी हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. यासाठी आवश्यक शिक्षण संस्था उभ्या राहायला पाहिजेत असे मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले.

देशाचा विचार करता केवळ 14 टक्के महिला उद्योजक दिसून येतात. येथील महिलांनीही उद्योग व्यवसाय मध्ये उतरले पाहिजे असे त्यांनी सांगितले. देशामध्ये केवळ एक टक्का मारवाडी समाज आहे. हा समाज अत्यंत कष्ट करून श्रीमंत बनवला आहे. श्रीमंताच्या यादीमध्ये देशात हा समाज 23% दिसून येत आहे. कोणतेही काम प्रामाणिकपणे केल्यावर यश नक्कीच मिळते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे विधारक दृश्य दिसून येत आहे. चरस, गांजा याची विक्री कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. नाहीतर येथील तरुण बरबाद होण्यास वेळ लागणार नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले.

वयाच्या पंधराव्या वर्षी राजकारणात आलो. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचा आशीर्वाद व सहवास लाभला. यामुळेच राजकारणात आपण विविध पदांवर काम करत राहिलो. राजकारणात काम करत असताना 11 पदे आपण भूषवली असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे काम आपण करू शकलो यामुळेच मोठमोठी पदे भूषवता आली. आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. याबद्दल व जनतेने आपल्यावर केलेल्या अपार प्रेमाबद्दल आभार मानताना आपल्याकडे शब्द कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button