
वाढीव विद्युत बिलांच्या विरोधात सुरू असलेल्या मनसेच्या आमरण उपोषणाला समविचारीचा पाठिंबा
रत्नागिरीतील विद्युत पारेखण कंपनीच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाढीव विद्युत बिलांच्या विरोधात आमरण उपोषण सुरु आहे.या उपोषण स्थळी महाराष्ट्र समविचारी मंचचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,आणि जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर यांनी आज भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या नागरिकांना अवास्तव बिले आकारुन विद्युत मंडळाने अन्याय केला आहे.शासन यामध्ये लक्ष देत नाही.अॉनलाईन भरलेली बिले वजावट होत नाहीत.मनसेने सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.आम्ही त्यांच्या सोबत नव्हे तर सबंधितांनी लक्ष दिले नाही तर प्रत्यक्ष सहभाग घेऊ असे समविचारीचे संजय पुनसकर यांनी जाहीर केले आहे.
www.konkantoday.com