
अपरांतमधील टेली आयसीयू सुविधा गंभीर रूग्णांसाठी जीवनदान देणारी ठरेल -आमदार शेखर निकम.
आरोग्याच्या क्षेत्रात स्थानिक पातळीवर जागतिक दर्जाची सेवा हे तत्व आता केवळ घोषवाक्य न राहता कृतत उतरू लागले आहे. या उपक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ डॉक्टरांची बांधिलकी आणि स्थानिक रूग्णालयाचे प्रयत्न यांची त्रिसूत्री एकत्र आली, तर कोणत्याही गंभीर रूग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा देणे शक्य झाले आहे. अपरांत हॉस्पिटलने सुरू केलेली आयसीयू ही सुविधा इथल्या गंभीर रूग्णांसाठी जीवनदान देणारी ठरणार असल्याचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले. वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यामुळे अत्यंत अत्यवस्थ रूग्णांच बरे होण्याचे प्रमाण वाढले, शिवाय मृत्यू दरात लक्षणीय घट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण, दुर्गम प्रदेशातील रूग्णालयात शहरातील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणारी टेली आयसीयू सेवा ही काळाची गरज ठरली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पाच त्रुटींचा वेध घेत कराड, पुणे येथील नामवंत, उच्चविद्या विभुषित वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आता अपरांत हॉस्पिटल चिपळूणमध्ये अशी टेली आयसीयू सेवा कार्यान्वित झाली आहे. आ. निकम यांनी या सुविधेचा सोमवारी शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.www.konkantoday.com