खेडचे मनसैनिक लवकरच राज ठाकरेंकडे कार्यकर्त्यांच्या प्रखर भावना मांडणार -वैभव खेडेकर

ज्या लोकांनी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून तुरूंगात डांबले, पक्ष संपवण्याचा अन फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासमवेत वाटचाल कशी करायची याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र अन प्रखर भावना आहेत. याबाबत लवकरच मनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्यापुढे व्यथा मांडणार असल्याची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिली. राज ठाकरे जो आदेश देतील त्या आदेशाचे पालनही केले जाईल असे स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या पार्श्‍वभूमीवर मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या अध्यक्षतेखााली मंगळवारी चिखले सभागृहात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या बैठकीत उत्तर रत्नागिरीतील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भूमिकेबद्दल व्यथा मांडत आपली मते व्यक्त केली. याबाबत लवकरच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचेही निश्‍चित करण्यात आले.ते म्हणाले गेल्या २० वर्षातील कोकणातील मनसेची वाटचाल संघर्षमय झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत कार्यकर्त्यांच्या संमिश्र भूमिका आहेत. पक्षाला संपविण्यासाठी नाना प्रकारे खटाटोप करत नााहक खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याबरोबरच त्यांच्याा व्यवसायावर गंडांतर आणणार्‍यांसमवेत वाटचाल कशी करायची, याबाबत सर्वच कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button