
राजापूर मध्ये हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या इसमाचा मोबाईल व दुचाकी चोरट्याने लांबवली.
राजापूरशहरातील रॉयल प्लाझा बिल्डिंग येथील नेहा कलेक्शन या दुकानासमोरून अज्ञात चोरट्याने १४ हजार रुपये किंमतीची दुचाकी आणि मोबाईल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजितकुमार कृष्णा शिरोडकर (वय ५६, व्यवसाय शिक्षक, मूळ रा. फोंडाघाट, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. राजापूर) हे ०५ एप्रिल २०२५ रोजी रात्री सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांच्या (एम.एच. ०८/वाय/८६४०) या स्प्लेंडर प्रो दुचाकीसह नेहा कलेक्शन दुकानाजवळ आले होते.
त्यांनी त्यांची दुचाकी तिथेच उभी केली आणि बाजूच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले.जेवणानंतर हॉटेलच्या बाहेर कठड्यावर बसले असताना, फिर्यादी शिरोडकर यांनी त्यांची सॅक आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन तिथेच ठेवला आणि ते लघुशंकेसाठी गेले. ते परत येईपर्यंत अज्ञात चोरट्याने त्यांची स्प्लेंडर प्रो दुचाकी (अंदाजे किंमत १०,०००/- रुपये), ४,०००/- रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल आणि काळ्या रंगाची जुनी सॅक चोरून नेली.