शिवसैनिकांनो न डगमगता कामाला लागा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत-ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम

शिवसैनिकांनो न डगमगता कामाला लागा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी केले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नावडी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला.

गावमळा येथील या बैठकीला माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, लोकसभा क्षेत्र संघटक नेहा माने, जिल्हा महिला संघटक वेदा फडके, संगमेश्वर तालुका प्रमुख नंदादीप बोरुकर, तालुका संघटक संतोष थेराडे, उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर, महिला उपतालुका संघटक मनिषा बने, महिला विभाग संघटक प्रिया सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक सतीश पाटणे, सलाउद्दिन बोट, आदी उपस्थित होते. या वेळी नावडी पंचायत समिती गणामध्ये नवीन पदनियुक्त्या करण्यात आल्या. नावडी पंचायत समिती विभाग प्रमुख म्हणून वैभव मुरकर आणि अल्पसंख्यांक विभाग प्रमुख म्हणून रईस अलजी यांची नियुक्ती करण्यात आली असे तालुका प्रमुख बंड्याशेठ बोरुकर यांनी जाहीर केले. तसेच उपस्थित शिवसैनिकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले.याप्रसंगी रवींद्र माने यांनी शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी आक्रमक भाषण केले. तर संतोष थेराडे यांनी कुठेही गरज पडल्यास आम्ही तयार आहोत असे आश्वासन दिले. प्रकाश घाणेकर यांनी शिवसैनिकांना संघटना बळकटी साठी कान मंत्र दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button