
लाडक्या बहिणींना केवायसी बंधनकारक
सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र आता निकषात न बसणार्या अनेक महिलांनी त्या योजनेचा फायदा घेतला. त्यामुळे गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने केवायसी बंधनकारक केली आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींनासुद्धा याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेत आता प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. याविषयीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. पात्र महिलांनी तातडीने ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांना सीएससी सेंटरवरून अथवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करता येईल. या प्रक्रियेत लाभार्थी महिलेचे नाव, पत्ता, आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाची माहिती भरावी लागेल. ही प्रक्रिया सुरू होताच रेंगाळत न राहता ईकेवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




