
राम नवमीच्या शुभमुहूर्तावर देवनगरी देवरुखमध्ये सेंद्रिय हापूस आंब्याची – ५ डझनला ₹७,५००! ची विक्रमी बोली
संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील *बेलारी बुद्रुक* येथील *_प्रकृतिका फार्म्स_* चे आधुनिक शेतकरी *अनुप आणि नीलिमा दिघे* यांनी आपल्या सेंद्रिय हापूस आंब्याची विक्री राम नवमीच्या पावनदिनी सुरू केली.



या मुहूर्तावर झालेल्या बोलीत, ५ डझन आंब्यांना विक्रमी ₹७,५०० किंमत मिळाली, ज्यामुळे देवरुख सह संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या मानाच्या पेटीचे भाग्यवान खरेदीदार ठरले देवरुखमधील प्रतिष्ठित नागरिक *मदन मोडक साहेब*. या मुहूर्ताच्या बोलीचे आयोजन क्रांती व्यापारी, देवरुख यांनी *साईनाथ कोल्ड्रिंक्स हाऊस येथे सकाळी 10 वाजता केले होते,* ज्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात *हेमंत तांबे, मुन्ना थरवळ, मोहन शेठ वनकर, नाना शेठ कोळवणकर, अभिजित शेट्ये, विलास शेलार, प्रमोद शेलार, राजू घोसाळकर, प्रवीण जागूष्टे, योगेश केदारी, महेंद्र कांगणे आणि प्रदीप जागूष्टे* यांचा समावेश होता.राम नवमी निमित्त आंब्याच्या पेटीची पूजा करून श्रीराम चरणी वंदन करून सुरू झालेल्या लिलावात लागलेल्या विक्रमी बोलीमुळे देवरुख आणि सह्याद्री दर्या खोऱ्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारली आहे.



विशेषतः कुंडी, नायरी, मार्लेश्वर, खडी कोळवण आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सेंद्रिय हापूस आंबा उत्पादनाची प्रेरणा मिळाली आहे. देवरुख बाजारातील या यशस्वी विक्रीमुळे शेतकरी आपल्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत आणण्यास उत्सुक आहेत.**क्रांती व्यापारी, देवरुख तर्फे निखिल कोळवणकर* यांनी सर्व मान्यवरांचे आणि शेतकऱ्यांचे आभार मानण्यात आले, तसेच नेहमी प्रमाणे *देवरुख आणि तालुक्याच्या विकासाकरिता भविष्यात अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले.*
