
खेड शहरातील मटण मच्छी मार्केट इमारतीचा नदीकडील बाजूचा भाग मोठ्या प्रमाणावर खचला
दोन दिवसांपूर्वी जगबुडी नदीला आलेल्या पुरामध्ये शहरातील नदी किनाऱ्यावर असलेल्या खेड नगरपरिषदेच्या मटण-मच्छी मार्केट इमारतीचा भाग पाण्याखाली गेला होता. त्याच ठिकाणी इमारतीला मोठेमोठे भगदाड पडल्याची बाब बुधवारी निदर्शनाला आली.
जगबुडी नदीकिनारी असणाऱ्या खेड शहरातील मटण मच्छी मार्केट इमारतीचा नदीकडे असलेल्या बाजूचा भाग मोठ्या प्रमाणावर खचल्याने मटण-मच्छी विक्रेत्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाहेरून आणि आतील भागात इमारतीचा भाग काही फूट खचला आहे.मार्केटमध्ये मटण विक्रेत्यांचे १७ गाळे असून, मटण खरेदीसाठी खेडमधील ग्राहकांची याठिकाणी गर्दी हाेते.
www.konkantoday.com