
*रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात वृद्धेचा जागीच मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभिर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची ही घटना रविवार 28 एप्रिल रोजी दुपारी 4 वा. सुमारास घडली आहे.रजिया बदरुद्दीन पठाण (65, रा.मच्छिमार्केट बाजारपेठ,रत्नागिरी) असे अपघातातील मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. तर रुखसार जुबेर पठाण (30) आणि जुबेर बदरुद्दीन पठाण (32,दोन्ही रा.मच्छिमार्केट बाजारपेठ,रत्नागिरी) हे दोघे या अपघातात गंभिर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. www.konkantoday.com