
चिपळुणातील नायशी आरोग्य केंद्रातील पॅरासिटामोल गोळ्यांवर बुरशीजन्य काळे ठिपके
वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या नायशी उपकेद्रांतून रुग्णांना देण्यात आलेल्या पॅरासिटामोलच्या गौळ्यांवर बुरशीजन्य काळे ठिपके आढळल्याने खळबळ उडाली. यासंदर्भात नायशी ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाकडे या संदर्भात तक्रार केली आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी पोलीस पाटील प्रशांत पवार आपला १२ वर्षीय मुलगा अंश पवार याला सर्दी झाल्याने नायशी उपकेंद्रात डॉ. ऐश्वर्या उदापूर यांच्याकडे तपासणीसाठी नेले. तपासणी करून घरी गेल्यानंतर पॅरासिटामोल गोळ्या घेताना त्यावर काळे ठिपके आढळले. पवार यांनी त्वरित उपसरपंच संदीप घाग व डॉ. ऐश्वर्या उदापूर यांना संबंधित प्रकाराबाबत माहिती दिली.
सदर गोळ्यांचे पॅकेट ८ ऑगष्ट २०२४ मधील असून त्याची एक्सपायरी मुदत ७ जुलै २०२६पर्यंत आहे. मात्र ठिपके आढळल्याने नायशी ग्रामपंचयातनेही वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली पांडे यांना सदर प्रकाराबाबत पत्रव्यवहार करुन सदर औषधचा साठा बदलण्यासाठी मागणी केली आहे.www.konkantoday.com




