गुहागर बायपास आज रात्री ९ ते सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद.

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे उर्वरित काम सुरू झाले असून आज शनिवार (५ एप्रिल) रोजी रात्री ९ वाजल्यापासून गुहागर बायपास येथे मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या मोरी व सर्व्हिस रोडचे काम करण्यात येत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरून गुहागर -चिपळूण बायपासकडे जाणारी-येणारी वाहतूक सोमवारी (७ एप्रिल) रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यानच्या कालावधीत नागरिकांची व वाहनचालकांची गैरसोय होणार आहे; परंतु पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित असल्याने वाहनधारकांनी कृपया पर्यायी मार्गांचा वापर करावा व ठेकेदार कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button