
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी श्रीकृष्ण (भाई) विलणकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असताना श्रीकृष्ण (भाई) विलणकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. गेली ५५ वर्षे कोकणात शरीरसौष्ठव या क्षेत्रात भाईंनी आपले वेगळे स्थान निर्माण केले असून त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी भाईंशी संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी भाईंच्या प्रेरणादायी कार्याचा सन्मान केला आणि भाईंच्या उत्तम आरोग्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.