
चिपळूण व्यापारी महासंघाने पुकारलेल्या बंद ला चिपळूणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
यशश्री शिंदेच्या अमानुष हत्येचा निचिपळूण व्यापारी महासंघाने पुकारलेल्या बंद ला चिपळूणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसादषेध आणि मारेकऱ्याला फाशी शिक्षा व्हावी यासाठी चिपळूण व्यापारी महासंघाने पुकारलेल्या बंद ला चिपळूणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पूर्ण चिपळूणमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.फक्त शहरच नव्हे तर आजूबाजूच्या गावामध्ये देखील दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी भक्कम एकजूट दाखवून दिली. राज्यात कुठेही अप्रिय आणि अमानुष घटना घडली की त्याचे परिणाम चिपळूणमध्ये लगेच उमटतात.उरण मध्ये यशश्री शिंदे हिच्या हत्येमुळे सर्वत्र संताप उसळला असून त्याचे पडसाद चिपळूणमध्ये देखील उमटले.हिंदुत्ववादी संघटनांनी गुरुवारी दणदणीत मोर्चा काढला होता.तर येथील व्यापारी महासंघाने शुक्रवारी बाजारपेठ बंद ची हाक दिली होती.त्याला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा वगळता चिपळूणात कडकडीत बंद पाळण्यात आला