
म्यानमारमध्ये पुन्हा भूकंप; अनेकजण अजूनही बेपत्ता कुजलेल्या मृतदेहांमुळे दुर्गंधी.
म्यानमारमध्ये आज पुन्हा एकदा 5.1 रिश्टर स्केलच्या भूपंपाच्या धक्क्यांनी हादरले. गेल्या तीन दिवसांत पाचहून अधिक भूपंपाचे धक्के बसले असून थायलंडमधील स्थितीही भयंकर आहे. म्यानमारमध्ये इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले गेल्याची शक्यता आहे.त्यामुळे मृतदेह कुजू लागले असून सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. अनेक नागरिक आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी स्वतः हाताने ढिगारा उपसण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे.
म्यानमारमधील आतापर्यंत तब्बल 1 हजार 644 जणांचा मृत्यू झाला असून 3 हजार 408 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत, तर 139 जण बेपत्ता आहेत.हिंदुस्थानकडून 40 टनांची मदतहिंदुस्थानी नौदलाच्या ‘आयएनएस सातपुडा’ आणि ‘आयएनएस सावित्री’ या युद्धनौकांच्या माध्यमातून ‘ऑपरेशन ब्रह्मा’ राबवण्यात आले. त्याअंतर्गत भूपंपग्रस्तांसाठी 40 टन रिलीफ सामग्रीची मदत देण्यात आली. याशिवाय 118 सदस्यीय फिल्ड हॉस्पिटल युनिटदेखील म्यानमारच्या मंडालय येथे पोहोचले. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी म्यानमारला 43 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली. तर रशियाच्या आणीबाणी मंत्रालयाने 120 बचाव पथके आणि दोन विमानांतून मदतसामग्री पाठवली. चीननेदेखील बचाव पथके पाठवली आहेत.