
१० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या शशिकांत खेडेकरचा मृतदेह १२ तासानंतर काढण्यात यश
राजापूर ः अर्जुना प्रकल्पात आंघोळीसाठी गेलेल्या व बुडून मृत्यूमुखी पडलेल्या पाचलमधील शशिकांत खेडेकर यांचा मृतदेह मालवण येथून आलेल्या स्कुबा ड्रायव्हर्सनी सुमारे बारा तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश मिळविले.
पाचलमधील खेडकर कुटुंबिय करक येथील अर्जुना धरण पहाण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान अवघ्या दहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या कुटुंबातील शशिकांत हा २६ वर्षीय तरूण धरणात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडू लागला. कुटुंबियांच्या समक्षच हा प्रकार घडला. मात्र ते हतबल होते. काही क्षणातच शशिकांत हा पाण्यात बुडाला. या दुर्घटनेतंर शशिकांत याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र त्याचा तपास लागत नव्हता. अखेर मालवण येथील स्कुबा ड्रायव्हर्सना बोलावण्यात आले. मंगळवारी सकाळी धरणात उतरून त्यांनी शशिकांत यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.