
मान्यता मिळाल्याने चिपळुणातील व्यावसायिकांना मटण-मच्छी, भाजी मंडईत जावे लागणार.
चिपळूणातील व्यावसायिकांच्या मागणीनुसार आता मच्छी-मटण मार्केटसह भाजी मंडईतील गाळे ३० वर्षांसाठी भाड्याने देण्याला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे. यापुढे रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करू दिले जाणार नसल्याने व्यावसायिकांना येथे जावे लागणार असून त्यांनी लिलाव प्रक्रियेत भाग घेतल्यानंतर दोन्ही प्रकल्पांचे स्टक्चरल ऑडिट व आवश्यक दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.ते पुढे म्हणाले की, या दोन्ही प्रकल्पांसाठी नगर परिषदेने करोडो रुपये खर्च केले आहेत.
मात्र गेल्या २० वर्षापासून काही कारणांमुळे हे प्रकल्प सुरू होऊ शकले नाहीत. याला व्यावसायिकांनी वेळोवेळी जाहीर झालेल्या लिलाव प्रक्रियेत न घेतलेला सहभाग हेही एक कारण आहे. लिलावात सहभाग न घेण्याला दिल्या जाणार्या कारणात त्यावेळी ना परतावा असलेली मोठी अनामत रक्कम, चिपळूण भाजी मंडई, मटण-मच्छी मार्केटमधील गाळ्यांचा लवकरच लिलाव होणार आहे. अधिक भाडे व कमी कालावधी अशी कारणे दिली जात होती. त्यामुळे आता काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत दोन्ही प्रकल्पातील गाळे ३० वर्षांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर ना परतावा असणारी अनामत रक्कम मच्छी-मटणमार्केटमधील गाळ्यांसाठी जास्तीत जास्त २ लाख ७१ हजार रुपये असून दरमहा भाडे ३,६५० रुपये आहे. भाजी मंडईतील गाळ्यांसाठी अनामत रक्कम जास्तीत-जास्त ३ लाख ६५ हजार रुपये, तर भाडे कमीत-कमी १,५०० ते २,४०० रुपये, ओट्यांसाठी अनामत रक्कम १ लाख ५२ हजार रुपये, तर भाडे १००० रुपये राहणार आहे. www.konkantoday.com