
गुहागर ते शासकीय विश्रामगृह रस्ता लवकरात लवकर न झाल्यास पराग कांबळे यांचा आंदोलनाचा इशारा
जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या गुहागर शहरातील प्रवेशद्वाराचा प्रमुख रस्ता गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह नजीकचे तिसरे वाकणपर्यंतचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून, मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहनधारकांना या मार्गावर वाहने हाकताना नाकीनऊ येत असून, येत्या काही दिवसांत या रस्त्याबाबत संबंधित ठेकेदार व सरकारी अधिकारी यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर उग्र स्वरूपातील आंदोलन छेडू, असा सज्जड इशारा बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार पराग कांबळे यांनी दिला आहे.
गुहागर शहर हे पर्यटन केंद्र आहे; मात्र येथील मुख्य रस्त्याची अवस्था बघितली तर येथे लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आहेत की नाही, असा प्रश्न पडत आहे. गुहागर-विजापूर मार्गावरील जे काही प्रश्न असतील ते आम्हाला माहित नाहीत; पण ठेकेदार व त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी अधिकारी यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथ: आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. कांबळे यांनी दिला आहे.