खेड नगरपालिका थकीत करदात्यांकडून आकारणार दंडाची रक्कम

_खेड नगरपालिकेने मालमत्ता करासह घरपट्टी व पाणीपट्टी कराची रक्कम वसुलीसाठी कंबर कसली आहे. यासाठी पथकेही कार्यरत आहेत. थकीत पाणीपट्टीधारकांचे नळकनेक्शन बंद करण्याची मोहीमही हाती घेतली.या पाठोपाठच आता पालिकेने थकीत रकमेवर प्रतिमहा २ टक्के म्हणजेच वार्षिक २४ टक्के दंडाची रक्कम आकारणार असल्याचा फतवा काढला आहे.थकीत करदात्यांना कराची रक्कम भरणा करण्यासाठी सातत्याने सूचना केल्या जातात. तसेच नोटिसाही बजावल्या जातात. मात्र तरीही करदाते कराची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे खेड पालिकेने थकीत रकमेवर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवडाभरात पाणी विभागातील पथकाने हाती घेतलेल्या मोहिमेदरम्यान ५०हून अधिक पाणीपट्टीधारकांवर कारवाईचा बडगा उगारत नळकनेक्शन बंद केले आहेत. या धडक कारवाईने थकीत करदात्यांचे धाबे दणाणले आहेत. थकीत कराची रक्कम ३१ मार्चपूर्वी भरणा न केल्यास नगर परिषद अधिनियम १९६५ कलम १५०-१५०-अ नुसार प्रति महिना २ टक्के म्हणजेच वार्षिक २४ टक्के दंडाची आकारणी केली जाणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button