
सावंतवाडीचे आ. दीपक केसरकर यांची शिवसेना मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती
शिवसेनेचे पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सावंतवाडीचे आ. दीपक केसरकर यांची शिवसेना मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर आ.केसरकर यांनी शिवसेना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. आपण गुढीपाडव्यापासून या पदाची पुन्हा जबाबदारी सांभाळणार असल्याचे आ. केसरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रात झालेल्या ऐतिहासिक सत्तांतर नाट्यानंतर श्री.केसरकर यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून पक्षाची अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली होती. दरम्यान, राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आ. केसरकरांकडील ही जबाबदारी कमी करण्यात आली होती. मात्र होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व सद्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता पक्षासह पक्षनेत्याची बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा आ. दीपक केसरकर यांना मुख्य प्रवक्ते म्हणून काम करा, अशा सूचना ना. एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. पक्षाख्या मुख्य नेत्यांनी दिलेला या आदेशाप्रमाणे मी गुढीपाडव्या पासून पुन्हा मुख्य प्रवक्ता म्हणून जबाबदारी संभाळणार असल्याचे आ. केसरकर यांनी सांगितले.