
रत्नागिरीत विश्वशांतीसाठी महासत्संग सोहळ्याचे आयोजन
रत्नागिरी. :- महासत्संग सोहळा आयोजन समिती, कोकण विभागाच्या वतीने रत्नागिरीत विश्वशांतीसाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पावन सोहळा १ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत संपन्न होईल. यामध्ये सामूहिक श्री स्वामी चरित्र सारामृत पठण तसेच श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन करण्यात येणार आहे.रत्नागिरी शहरात १ एप्रिल रोजी होणाऱ्या महासत्संग सोहळ्याची माहिती देण्यासाठी साळवी स्टॉप येथील मठात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या पत्रकार परिषदेला संतोष यादव, सूर्यकांत सावंत, प्रभाकर रहाटे, अरुण नाचणकर, मनोज करंगुटकर, मनोहर पारकर, दिव्या आगीने, संपदा यादव, वैशाली महाडिक, स्वाती सावंत आदि उपस्थित होते.हा कार्यक्रम नवीन ट्रक वाहनतळ, स्टेट बँक कॉलनी जवळ, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सायंकाळी ६ वाजता परम पूज्य श्री. अण्णासाहेब मोरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या पवित्र सोहळ्यात सर्व भक्तगणांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.