
विनेश, तुम्ही चॅम्पियन आहात. भारताच्या गौरव आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहात-पंतप्रधान नरेंद्र मोदी
फोगटचं सुवर्णपदकांचं स्वप्न भंगलं. भारतीयांचाही अपेक्षा भंग झाला. या प्रकारावरून देशभरात संतापाची उसळली असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मोदींनी थेट पॅरिसमध्ये फोन केला आणि या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम मोदींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाची माहिती घेतली. या निर्णयानंतर भारताकडे काय पर्याय शिल्लक राहतात याचीही माहिती घेतली. या प्रकरणात सर्व पर्यायांवर विचार करा. तसेच अयोग्यतेच्या या निर्णयाच्या विरोध तीव्र आक्षेप नोंदवा असा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या.पीएम मोदींनी सोशल मिडियावर पोस्ट लिहीत या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. विनेश, तुम्ही चॅम्पियन आहात. भारताच्या गौरव आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहात. तुमचं अपयश दुःखं देतं. शब्दांत या निराशेच्या भावनांना व्यक्त करता आलं असतं. आव्हानांचा सामना करणं तुझ्या स्वभावात राहिलं आहे. आणखी मजबूत होऊन परत ये आम्ही सगळे तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत, असे ट्विट मोदींनी केले